Peoples Media Pune header

Go Back

संपादकीय

Pune 27 May 2011

गेली अनेक वर्षे पत्रकारीता-जनसंपर्क क्षेत्रात काम करीत असतांना अनेक तांत्रीक-तंत्रज्ञान विषयक सामाजिक,राजकीय, सांस्कृतीक, अर्थिक बदल पहात आलो.

जागतिकीकरणाचा बोलबाला असलेल्या या काळात माध्यमे ही माहीती तंत्रज्ञान क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात वापर करू लागली आहेत. त्यातीलच एक महत्वाचे म्हणजे इंटरनेट हे माध्यम प्रिंट मिडीया व TV चॅनेल माध्यमांपेक्षा गतिमान आहे. व महत्वाचे म्हणजे अत्यंत स्वस्त कमी गुंतवणूक असलेला, आपली बातमी-माहिती फक्त शहरातच नव्हे तर जगभरात पाठविता येते. अनेक मोठ्या माध्यमांवर भांडवलदारांचा कब्जा असल्यामुळे गरीब सर्वसामान्यांच्या प्रश्नांचा फक्त दिखाऊ वापर केला जातो व व्यवस्थापनाच्या धोरणांचाही त्यावर मोठा प्रभाव असतो. यासाठी मी ठरविले की करोडपतीं पासून ते फुटपाथवर रहाणा-यांसाठी सुद्धा काम करणारे माध्यम असले पाहीजे. यासाठी सभा-संमेलनांमध्ये मिडीयाने हे करावे, ते करावे अशी पोपटपंची करण्या ऎवजी स्वत: त्यासाठी काम करावे यासाठी http://www.peoplesmediapune.com ची निर्मीती केली आहे.

कोणत्याही धर्मभेद, जातीभेद, पक्षीय दृष्टीकोन, गरीबी, श्रीमंती न पहाता केवळ सकारात्मक दृष्टीकोण ठेवून राजकीय, सामाजीक, शैक्षणिक, सांस्कृतीक आणि अर्थिक वृत्तांचे प्रसारण सर्वत्र अगदी प्रसार माध्यमांपर्यंतही करण्यासाठी या वेबसाईटचा उपयोग करण्यात येईल. वा यामध्ये एक पथ्य कायम पाळले जाईल ते म्हणजे कोणत्याही विध्वंसक प्रवृत्तीला प्रोत्साहन देण्या ऎवजी नवनिर्माणास महत्व दिले जाईल. मात्र भ्रष्टाचार, अपप्रवृत्ती, गुन्हेगारी या समाजाला घातक असलेल्या गोष्टींवर कोणताही मुलाहीजा न बाळगता प्रहार करण्यात येईल. ही वेबसाईट पुणेकर जनतेला आपली तर वाटलीच पाहीजे पण सर्वांच्या विकासासाठी तीच्याद्वारे सहाय्य झाले पाहिजे असा माझा प्रयत्न राहील. – राजेद्र सोनार. ९५४५६४८४५९

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite