Peoples Media Pune header

Go Back

आयबीएस पुणेचा सिंगापुर, इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स बरोबर सहकार्य करार

पुणे 06 May 2011 peoplesmediapune

बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील पुण्यात अग्रगण्य असलेल्या आयबीएस पुणे व सिंगापुर इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्यात नुकताच सहकार्य करार सिंगापुर येथे करण्यात आला.  यामध्ये या दोन्ही संस्थांमध्ये चर्चासत्रे आयोजन, बैठका, कार्यशाळा याच बरोबर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम तसेच प्रशिक्षण व भेटी यांचा समावेश आहे.  यामध्ये आयबीएस मधील विद्यार्थी व प्राध्यापक यांना सिंगापूर येथील इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स सदस्यांबरोबर वरील उपक्रम राबविता येतील.  म्हणजेच या कराराद्वारे विद्यार्थी वर्गाचा दृष्टीकोन विस्तृत होण्यास तसेच त्यांच्या कर्तृत्वाला नवे क्षेत्र उपलब्ध होईल असे धनंजय केसकर यांणी पत्रकात नमूद केले.  या करारावर आयबीएसच्या वतीने प्रो. धनंजय केसकर तर सिंगापूर इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स च्या वतीने आर.नारायण मोहन यांनी स्वाक्षरी केली. 

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite