Peoples Media Pune header

Go Back

“व्हीमास मराठी” प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज. प्रेक्षकांना चौफेर मनोरंजनाची भेट,झाला दणदणीत प्रारंभ !

12 Mar 2021

व्हीमास एशिया” मनोरंजन जगताचा वेध घेणारा आशियातील आंतरराष्ट्रीय ओटीटी पालफोर्म आहे.या फ्लॅटफॉर्मवरील कार्यक्रमाचा आस्वाद तुम्ही जगभरातील कोणत्याही ठिकाणाहून घेवू शकता.या प्लॅटफॉर्मवर उच्च दर्जाचे,विविध प्रतीचे,वेगवेगळ्या वयोगटातील आकर्षक कार्यक्रम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.या प्लॅटफॉर्म वरील चित्रपट,मालिका,विविध शोज,आणि इतर आणखी काही कार्यक्रमांद्वारे प्रेक्षकांच्या परिपूर्ण मनोरंजनाबरोबरच त्यांना विविध माहिती देण्याचाही उद्देश आहे.चित्रपट प्रेमींसाठी एक नवीन प्लॅटफॉर्म आता सुरू झाला आहे. जेणेकरून प्रेक्षकवर्ग पॉपकॉर्न आनंद घेत चित्रपटाची ही मजा लुटू शकतील. व्हीमास एशिया यूएसपी – “व्हीमास एशिया”हा प्लॅटफॉर्म वैशिष्टयपूर्ण अशासाठी आहे की,कोणत्याही भागातील प्रेक्षकवर्ग त्यांच्या स्थानिक भाषांमधील अमर्यादित मनोरंजनाचे कार्यक्रम अगदी सहजतेने येथे पाहू शकेल.   या प्लॅटफॉर्मवरील आशयाची निवड करताना जगभरातील प्रेक्षकांच्या आवडीनिवडीचा,त्यांच्या वयोगटाचा विचार करण्यात आला आहे. त्यादृष्टीने कार्यक्रमांमध्ये विविधता आणली गेली आहे.आपल्या ग्राहकांना परिपूर्ण मनोरंजनाचा आनंद देणे यावरच लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.व्हीमास आशिया नेटवर्क हा भारतीय उपक्रम “व्हीमास एशिया”शी संलग्न असून तो मनोरंजनाचा एकमेव पर्याय आहे.पहिल्या टप्प्यामध्ये दक्षिण-पूर्व आशिया विभागावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.त्याचाच एक भाग म्हणून एसइएपी समुहाशी जोडलेल्या भारतामधून स्थानिक भाषांमधील प्रसारणाची सुरुवात होणार आहे.व्हीमासतर्फे स्थानिक भाषांमधील विविध ब्रॅंडस प्रेक्षकांसमोर येणार असून त्याचा प्रारंभ “व्हीमास मराठी”द्वारे होणार आहे.

विशेष मराठी कार्यक्रम

व्हीमास एशिया तर्फे “व्हीमास मराठी”या नव्या कोर्‍या प्लॅटफॉर्मचा प्रारंभ महाराष्ट्राची संस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरातून होणार आहे. मराठी तसेच स्थानिक भाषांमधील कार्यक्रमांच्या सदरीकरणामधील हे क्रांतिकारी पाऊल असून ते मनोरंजनाची व्याख्याच बदलणार आहे.व्हीमास मराठीचा प्रारंभ झाल्यानंतर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या प्रेक्षकांसाठी हा प्लॅटफॉर्म मनोरंजनाचा एकमेव पर्याय राहणार आहे.या प्लॅटफॉर्मची दणदणीत सुरुवात होत आहे.व्हीमास मराठीचा प्रारंभ झाल्यानंतर त्याचे आप्लीकेशनही लगेच सुरू होईल.सध्या या प्लॅटफॉर्मद्वारे चित्रपट,वेब सिरिज,विविध शोज,लघुपट त्यांच्या आशयाचे हक्क मिळविण्याचे काम वेगाने सुरू आहे.मराठी माणूस नेहमीच आपल्या मनोरंजनाच्या आवडीनिवडी बद्दल चोखंदळ राहिला आहे.त्यामुळेच व्हीमास मराठीची रचना वेगळ्या पद्धतीने केली असून त्यांना या प्लॅटफॉर्मवर नवीन मालिका,चित्रपट,लघुपट,स्थानिक भाषांमधील कार्यक्रमाचा आस्वाद घेता येणार आहे.व्हीमास एशिया तर्फे केवळ मराठीतच नव्हे तर हिन्दी,पंजाबी,बांगला आणि गुजराती भाषांमधील प्रेक्षकांसाठीही नवीन फ्लॅटफॉर्म सुरू केले जाणार आहेत.

 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite