Peoples Media Pune header

Go Back

महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या घरी पर्यावरण पूरक होळीचा उत्सव संपन्न...*

29 Mar 2021

पुणे/मुंबई दि.२८ : आज होळी निमित्ताने महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पुणे येथील घरी होळीनिमित्त पूजा केली. विधिवत पूजा यावेळी गोऱ्हे कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आली तसेच नैवद्य आणि प्रदक्षिणा होळीला घालण्यात आल्या. यावेळी सर्व देवी देवतांना वंदन तसेच होळीला डॉ.गोऱ्हे यांच्यासह त्यांच्या आई लतिका गोऱ्हे, बहीण जेलहम जोशी, डॉ.चारुदत्त जोशी सर्व कर्मचारी वर्गाने वंदन केले. कोरोनाचे जे संकट अधिक घट्ट होत आहे यातून मार्ग निघून महाराष्ट्रातील नागरिकांना मोकळा श्वास लवकरच घेता यावा यासाठी डॉ.गोऱ्हे यांनी प्रार्थना केली. तसेच शेतकरी, मच्छिमार, कामगार यांच्यावर हवामान बदलामुळे जे संकट तयार झाले आहे याप्रकारच्या संकटातून मानवजातीला मुक्तता मिळावी. राज्यातील जनतेला सुख, सुरक्षित, निरामय आरोग्य प्रत्येकाला मिळावे आणि शांततामय जीवन मिळावे अशी देखील प्रार्थना डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी केली. पक्षाने तसेच जनतेने जो विश्वास आणि जबाबदाऱ्या डॉ.गोऱ्हे यांच्यावर टाकल्या आहेत त्या ईश्वराच्या आशिर्वादाने आतापर्यंत निस्वार्थीपणे त् पार पडल्या आहेतच यापुढे देखील त्यांच्याकडून जनतेची तसेच पक्षाची सेवा ह्वावी अशी प्रार्थना देखील ना.डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी केली. ना.डॉ.गोऱ्हे यांच्या येथे साजरी करण्यात आलेल्या होळीचे दर्शन परिसरातील नागरिकांनी उत्साहात घेतले तसेच यावेळी कोव्हिडं-१९ च्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्यात आले होते.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite