Peoples Media Pune header

Go Back

आरोग्य सेवा आयुक्तालय यांचे परिपत्रक दिनांक 23 मार्च, 2021 नुसार कोविडग्रस्त महिला / कोविड केंद्रातील महिलांच्या सुरक्षेबाबतSOP जाहीर करण्यात आलेली आहे, त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे डॉ. नीलम गोर्हे उपसभापती विधानपरिषद, यांचे आवाहन*

08 Apr 2021
पुणे दि.०७ :- 1. स्त्री रूग्ण व पुरूष रूग्ण दाखल करताना स्वतंत्र कक्षामध्ये दाखल करावेत. 2. स्त्री रूग्ण तपासण्यासाठी शक्यतो महिला डॉक्टरनी तपासणी करावी महिला डॉक्टर उपलब्ध नसतील तेथे पुरूष डॉक्टरनी स्त्री रूग्णाची तपासणी करताना स्टाफ नर्स अथवा स्त्री परिचर यांचे उपस्थितीत करावी. 3. स्त्री रूग्णांना स्त्री कक्षात स्वतंत्रपणे वेगळे ठेवावे. 4. रूम मध्ये रूग्ण ठेवताना एका कक्षात दोन अथवा जादा स्त्री रूग्ण ठेवावेत जेणेकरून त्यांचे मनोबल वाढून सुरक्षिततेची भावना वाढेल. 5. स्त्री रूग्ण कक्षासाठी स्त्री सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी. 6. स्त्री कक्षामध्ये स्वच्छता व इतर कामांसाठी स्त्री स्वच्छता सेवक व स्त्री परिचर यांची व्यवस्था करावी. 7. स्त्री रूग्ण गावाबाहेरील कोवीड सेंटर्समध्ये दाखल न करता शहरातील मध्यवर्ती ठिकाणच्या कोव्हीड सेंटर्समध्ये दाखल करावेत. 8. स्त्री कक्षामध्ये पुरूष सुरक्षा रक्षक / पुरूष परिचर राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी. 9. कोव्हीड सेंटर्ससाठी CCTV व्यवस्था चालू स्थितीत राहील याची काळजी घ्यावी. जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या हालचालीवर देखरेख (Monitoring) करता येईल व जरूरीच्या वेळी CCTV रेकॉर्डिंग उपलब्ध होऊ शकेल. 10. स्त्री रूग्णांना त्यांचे कक्षात मोबाईल फोन वापरण्याची परवानगी द्यावी. 11. स्त्री रूग्ण दाखल असल्यास त्यांचे नातेवाईकांना रूग्णाशी दररोज 1-2 वेळा संपर्क साधण्याबद्दल कळवावे. (दूरध्वनीद्वारा) 12. कोणत्याही परिस्थितीत पुरूष डॉक्टरनी एकट्याने स्त्री रूग्णास तपासणी करू नये, अथवा स्त्री कक्षात जाताना व रूग्ण तपासताना स्त्री अधिपरिचारिका / स्त्री परिचर यांचे उपस्थितीतच रूग्णाची तपासणी करावी. सदर परिपत्रकानुसार सर्व महिला प्रश्नावर काम करणाऱ्या संघटनांनी , प्रभावी अंमलबजावणी साठी प्रयत्नशील रहावे असे आवाहन डॉ. नीलम गोर्हे उपसभापती विधानपरिषद यांनी केले आहे. या सुचनांबाबत अनेक संघटनांनी विचारणा केली होती. मविमच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे (पालघर), श्रीमती किरण मोघे (पुणे), मेधा कुलकर्णी (पनवेल), फरिदा लांबे, चित्रा वाघ, प्रतिभा शिंदे, अस्मिता गायकवाड (सोलापूर), सुनीता मोरे (सांगली), संगीता चव्हाण (बीड) , निरजा भटनागर यांसह अनेक कार्यकर्त्यानी माहितीच्यासाठी संपर्क केला होता म्हणून याबाबतीत कळवत असल्याचे ना.नीलम गोर्हे यांनी कळवले आहे संपर्क:प्रविण सोनवणे 7972770533

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite