Peoples Media Pune header

Go Back

रोटरी फोरच्यूनच्या वतीने पोलिसांना कोव्हिड प्रतिबंधक शिल्ड वाटप.

11 Apr 2021

कोरोनाची दुसरी लाट आली असून मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढ होत आहे. मात्र या परिस्थितीत ही पोलिस अधिकारी,कर्मचारी,महिला पोलिस व अन्य हे आपली ड्यूटी निभावत आहे. या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब ऑफ पुणे फोरच्यूनच्या वतीने डिसीपी झोन 3 येथील पोलिस व महिला पोलिस यांना १०० फेस शिल्ड प्रदान करण्यात आले. या प्रसंगी रोटरी क्लब फोरच्यूनचे माजी अध्यक्ष रो.डॉ.दीपक तोषणीवाल,नियोजित अध्यक्ष असित शहा उपस्थित होते.

छायाचित्र : कोव्हिड प्रतिबंधक फेस शिल्ड प्रदान करताना दीपक तोषणीवाल व असित शहा. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite