Peoples Media Pune header

Go Back

युवा नृत्य कलाकार आशुतोष संकाये पाटील यांना “राज्यस्तरीय आदर्श युवक महाराष्ट्र यूथ आयडॉल कलारत्न -2020” पुरस्कार प्राप्त।

11 Jul 2021

युवा नृत्य कलाकार आशुतोष संकाये पाटील यांना “ राज्यस्तरीय आदर्श युवक महाराष्ट्र यूथ आयडॉल कलारत्न – २०२० या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एमव्हीएलए ट्रस्ट मुंबईच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.स्टारग्लिझे अॅकाडमी यथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले,माजी पोलिस उपआयुक्त शहाजीराव पाटील,ज्येष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर,प्रसिद्ध अभिनेते विजय पटवर्धन,वरिष्ठ पोलिस निरीक्षक संपत भोसले,नृत्य दिग्दर्शक मयूर अडागळे,व स्टारग्लिझेचे सदस्य उपस्थित होते. फेटा,शाल,मानपत्र,पदक व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

छायाचित्र : आशुतोष संकाये पाटील यांचा सत्कार करतांना मान्यवर. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite