Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब पाषाणच्या अध्यक्षपदी अवनी धोत्रे.

12 Jul 2021

रोटरी क्लब पाषाणच्या अध्यक्षपदी रो.अवनी धोत्रे यांची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष रो.विजय रेखी यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली. सेक्रेटरीपदी रो.अमित भदे यांची निवड करण्यात आली. हॉटेल क्लार्क इन  येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी इंटरनॅशनल डायरेक्टर डॉ.महेश कोटबागी होते. तसेच रोटरी प्रांत ३१३१ चे प्रांतपाल रो.पंकज शहा.क्लब डायरेक्टर रो.अभय सावंत,अशोक पाठक व रोटरी सदस्य उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना नवनिर्वाचित अध्यक्ष रो.अवनी धोत्रे यांनी क्लब च्या गेल्या २० वर्षातील सामाजिक कार्याचा वारसा पुढे ठेवून पर्यावरण,आरोग्य,शिक्षण,महिला सबलीकरण व अन्य सामाजिक प्रकल्प राबविणार असल्याचे संगितले. कोरोनाचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम संपन्न झाला.                 

छायाचित्र : अवनी धोत्रे.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite