Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब पर्वतीच्या अध्यक्षपदी शेखर लोणकर.

14 Jul 2021

रोटरी क्लब ऑफ पर्वतीच्या अध्यक्षपदी रो.शेखर लोणकर यांची निवड करण्यात आली.मावळत्या अध्यक्ष रो.माया फाटक यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली.सेक्रेटरीपदी रो.अमर कोटबागी,पीआय डायरेक्टरपदी रो.पराग गोरे यांची निवड करण्यात आली.मित्रमंडळ सभागृह येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष माजी प्रांतपाल रश्मी कुलकर्णी,माजी प्रांतपाल विनय कुलकर्णी,सहाय्यक प्रांतपाल शिरीष पुराणिक,व क्लब सदस्य उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष शेखर लोणकर यांनी रोटरी सामाजिक कार्यात,पर्यावरण,शिक्षण,आरोग्य,व अन्य क्षेत्रांत कार्य करीत असते त्या क्षेत्रांत आगामी काळात विविध प्रकल्प राबविणार असल्याचे संगितले.

छायाचित्र :रो. शेखर लोणकर. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite