Peoples Media Pune header

Go Back

लायन्स क्लब रिजन १ च्या वतीने फॅमिली डॉक्टर्सचा सत्कार.

14 Jul 2021

डॉक्टर्स डे निमित्त अनेक डॉक्टर्सचा सत्कार होतो. समारंभ करण्यात येतो.अनेक मान्यवर त्यात सहभागी होतात.मात्र लायन्स क्लब पुणे रिजन १ च्या वतीने या सगळ्या बाबींना फाटा देत आपल्या फॅमिली डॉक्टर्सचा सत्कार केला. या रिजन मधील १८ लायन्स क्लबांनी- त्यांच्या सदस्यांनी आपापल्या फॅमिली डॉक्टरांना त्यांच्या क्लिनिकमध्ये जावून सत्कार केला. या उपक्रमात लायन्स क्लब पुणे रिजन १ चे चेयर पर्सन ला. दीपक लोया,झोन चेयर पर्सन - ला.परिणिता देशपांडे,ला.ज्योतीकुमार आगरवाल,ला.संगीता सांडभोर व १८ क्लबच्या सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला.अनेक फॅमिली डॉक्टरांनी आनंद व्यक्त केला.आजपर्यंत कोणत्याच रुग्णांनी आमचा सत्कार केला नव्हता असे संगितले.

छायाचित्र :फॅमिली डॉक्टर यांचा सत्कार करताना लायन क्लब सदस्य

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite