Peoples Media Pune header

Go Back

श्री स्वामी बॅग्जच्या वतीने यंदाचे रोपे वाटप,लसीकरण केंद्रांवर.

14 Jul 2021

कोरोना महामारी मुळे यंदाच्या वर्षी प्रतिपंढरपूर समजल्या जाणा-या विठ्ठलवाडी येथे मंदिर उघडणार नाही. त्यामुळे गेले २१ वर्ष सुरू असणारी रोपे वाटप परंपरा कायम ठेवत श्री स्वामी बॅग्ज पुणे व शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठानच्या वतीने मंगळवार  २० जुलै २०२१ रोजी तुलसी व औषधी रोपांचे वाटप करण्यात येणार आहे. हे वाटप राजाराम पूल सिंहगड रोड,व सिंहगड रोड येथील लसीकरण केंद्र – १)स्व.रमेशभाऊ वांजळे जलतरण तलाव लसीकरण केंद्र,२)कुद्ळे पाटील गार्डन माणिकबाग,३)हणमंतराव गणपतराव जगताप मनपा शाळा हिंगणे खुर्द,४)बहूद्देशीय हॉल विश्रांती नगर,येथे सकाळी १० वजता वाटप सुरु होईल. लसवंत व्हा रोपे घ्या व ऑक्सिजन मोफत मिळवा असा या उपक्रमाचा हेतु असल्याचे श्री स्वामी बॅग्ज पुणेचे राहुल जगताप व शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठानचे बाळासाहेब परदेशी यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.  

छायाचित्र :वाटपासाठीची रोपे. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite