Peoples Media Pune header

Go Back

देवदासी महिलांचे लसीकरण संपन्न.

15 Jul 2021

विधान परिषद उपसभापती मा.ना नीलमताई गो-हे यांच्या निर्देशानुसार सिंहगर्जना प्रतिष्ठानच्या पुढाकाराने ३०० देवदासी महिलांचे लसीकरण संपन्न झाले. बुधवारपेठ सिटीपोस्ट चौक येथील ११ नं गुजराती शाळा मुलींची येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी विधानपरिषद उपसभापती मा.ना नीलमताई गो-हे.आयोजक राजेंद्र नाना शिंदे,अश्विनी शिंदे,माजी नगरसेवक प्रशांत बधे,बाळासाहेब मालुसरे,अनमोल परदेशी,बकुळभाऊ डाखवे,अविनाश मरळ,संतोष सिन्नरकर,रोहित गवळी,मयूर चाचुर्डे.आदी मान्यवर उपस्थित होते. बर्‍याच देवदासी महिलांकडे आधार वा अन्य ओळखपत्र उपलब्ध नसते यासाठी अशा उपक्रमाची सर्वत्र गरज आहे असे डॉक्टर गो-हे यांनी नमूद केले.या लसीकरण प्रसंगी तणावाने एका महिलेच्या डोळ्यात अश्रु आले होते तेव्हा डॉ.गो-हे यांनी तिला धीर दिला.    

छायाचित्र :लसीकरण प्रसंगी नीलमताई गो-हे,राजेंद्र शिंदे,अश्विनी शिंदे. व अन्य 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite