Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब हिलसाईडच्या अध्यक्षपदी रो.संजय डोळे.

16 Jul 2021

रोटरी क्लब हिलसाईडच्या अध्यक्षपदी रो.संजय डोळे यांची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष उमेश नाईक यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली.सेक्रेटरीपदी अभय जबडे यांची निवड करण्यात आली त्यांनी मावळते सेक्रेटरी चंद्रशेखर महामुनी यांच्याकडून सूत्रे स्वीकारली.खजिनदारपदी अदिती रहाणे यांची निवड झाली.हॉटेल क्लार्क इन येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी भावी प्रांतपाल रो.मंजु फडके उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष संजय डोळे यांनी आगामी काळात सार्थक सेवा संघ येथे मदत कार्य व वृक्षारोपण,गुंजाळवाडी धरण प्रकल्प,तसेच विविध समाजोपयोगी प्रकल्प राबविणार असल्याचे संगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुजा गिरी यांनी केले. 

छायाचित्र : संजय डोळे. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite