Peoples Media Pune header

Go Back

*पुण्यात अकरावीला शिकणाऱ्या विद्यार्थिनीला त्रास देऊन लैंगिक शोषण करणार्‍या शिक्षकाला त्वरित आरोपपत्र दाखल करण्यात यावे * *उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे*

19 Jul 2021

पुणे: १९ जुलै दि. १४ जुलै, २०२१ रोजी पुण्यामध्ये एका नामवंत महाविद्यालयात अकरावीला शिकणाऱ्या विद्यार्थिनीला तिथल्या शिक्षकांनीच त्रास देऊन लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आला होता .याबद्दल नीलमताई गोर्हे यांनी त्वरित दखल घेऊन फिर्याद दाखल करून घेऊन समुपदेशन करण्याच्या सुचना केल्या होत्या . आज अकरावीला शिकणाऱ्या विद्यार्थीने आपल्या आई-वडींलासह पुण्यात नीलमताईंच् गोर्हे यांच्या निवासस्थानी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.गोऱ्हे यांची भेट घेतली. त्यावेळेस त्या म्हणाल्या की घटनेबद्दल आरोपीच्या विरूध्दात लवकरात-लवकर दोषारोप पत्र दाखल करण्यासंदर्भात पोलीस वरीष्ठांना सुचवण्यात येईल तसेच या मुलीला योग्य न्याय मिळावे म्हणून केस विषयी विशेष सरकारी वकील नियुक्त करण्यात यावे या करीता मा.गृहमंत्री यांना पत्र देण्यात येईल .नीलमताईंनी या मुलीला समुदेशन करून मानसिक आधार दिला. सर्व प्रकारची कायदेशीर मदत करू व न्याय मिळू असेही डॉ.गोऱ्हे यांनी या वेळी सांगितले.यावेळी शिवसेना पदाधिकार श्री. अनंत घरत ऊपस्थित होते.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite