Peoples Media Pune header

Go Back

आषाढी वारी निमित्त श्री स्वामी बॅग्ज व शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठानच्या वतीने तुळसी व अन्य अकरा हजार रोपांचे वाटप.

20 Jul 2021

गेले २१ वर्ष आषाढी वारी निमित्त प्रतिपंढरपूर विठ्ठलवाडी येथे रोपांचे वाटप करण्यात येते,मात्र कोरोना महामारी मुळे येथील विठ्ठल मंदिर भाविकांसाठी बंद होते यंदा  यंदा श्री स्वामी बॅग्ज व शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आषाढीवारी निमित्त नागरिकांना तुळसी,औषधी,व अन्य अकरा हजार रोपांचे वाटप करण्यात आले. याचा शुभारंभ राजाराम पूल येथे करण्यात आला.या प्रसंगी नगरसेवक प्रसन्नदादा जगताप,श्री स्वामी बॅग्जचे राहुल जगताप,शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठानचे बाळासाहेब परदेशी,संतोष धावले,अभिषेक गुजराती,रमेश दौंडकर,मनोज उत्तेकर,अविनाश खंडारे,आदी  मान्यवर उपस्थित होते.एका ठिकाणी गर्दी होवू नये म्हणून या उपक्रमचे स्व.रमेशभाऊ वांजळे जलतरण तलाव लसीकारण केंद्र,कुदळे पाटील गार्डन,हणमंतराव गणपतराव जगताप मनपा शाळा हिंगणे,बहूद्देशीय हॉल विश्रांतीनगर,हिंगणे चौक येथे विभागून ६ ठिकाणी  वाटप करण्यात आले.या प्रसंगी बोलताना राहुल जगताप यांनी “लसवंत व्हा,रोप घ्या आणि ऑक्सीजन मोफत मिळवा”,“झाडे लावा झाडे जगवा’,“झाडे लावा मोफत ऑक्सीजन मिळवा”,हा संदेश सर्व नागरिकांना मिळावा या हेतूने या उपक्रमाचे आयोजन केल्याचे संगितले.

छायाचित्र :रोपे वाटतांना मान्यवर. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite