Peoples Media Pune header

Go Back

रोटरी बावधन इंटरेक्ट क्लबचा पद्ग्रहण सोहळा.

24 Jul 2021

रोटरी बावधन संचालित चेतन दत्ताजी गायकवाड शाळेतील इंटरेक्ट क्लब विद्यार्थ्यांचा पद्ग्रहण सोहळा नुकताच पार पडला. त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री वाघमारे सर, शाळेचे इतर मान्यवर, रोटरी बावधन चे अध्यक्ष तुषार कोल्हे, दीपाली कोल्हे, सचिव अपर्णा महाजन, मावळते अधक्ष्य अर्पिता गुहा, रोटरीयन निलेश झोटिंग, चंद्रकांत नेमाडे, स्मिता शितोळे, तेजश्री पाटिल, इंटरेक्ट डिरेक्टर बीना मेनन उपस्थित होते. बीना मेनन यांनी सूत्र संचालन केले. अध्यक्ष तुषार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वाघमारे सरांनी मुलांना या उपक्रमाची आणि रोटरी बावधनची कश्या प्रकारे शाळेला मदत होते हे सांगितले. रोटरीयन निलेश झोटिंग यांनी सर्वांचे आभार मानले आणि मुलांना सांगितले की फक्त समोर बसून टाळ्या न वाजवता आपण व्यासपीठावर कसे येवू हा विचार ठेवायचा, दृष्टीकोन हा शब्द छोटा असला तरी खूप मोठा बदल घडवीन्याची ताकद त्याच्यात आहे.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite