Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब मिड ईस्टच्या अध्यक्षपदी कृष्णा सिंगर.

24 Jul 2021

रोटरी क्लब मिड ईस्टच्या अध्यक्षपदी कृष्णा सिंगर यांची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष रो.रोमेशकुमार गुप्ता यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली. रो.बहुलीकर यांची सेक्रेटरी पदी निवड झाली. रो.सुहास चव्हाण यांच्या कडून बहुलीकर यांनी सूत्रे स्वीकारली. हॉटेल रविराज येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी नियोजित प्रांतपाल डॉ.अनिल परमार,सहाय्यक प्रांतपाल रो.राजेश राऊत,रो शितल शहा,रो राजेंद्र भवाळकर,आदी मान्यवर उपस्थित होते. कु.ऋतु कुलकर्णी हिने गणेश वंदना सादर केली. रसिका भवाळकर यांनी सूत्र संचालन केले. आभार प्रदर्शन सुहास चव्हाण यांनी केले. या प्रसंगी बोलताना नवनियुक्त अध्यक्ष कृष्णा सिंगर यांनी आगामी काळात सामाजिक उपयोगाचे अनेक प्रकल्प राबविणार असल्याचे संगितले.

छायाचित्र :कृष्णा सिंगर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite