Peoples Media Pune header

Go Back

“मा.उद्धवजी ठाकरे यांना दीर्घायुरारोग्य लाभावे,कोरोना व नैसर्गिक आपत्ती विरूद्ध लढण्याचे बळ मिळावे.व या पीडितांची सेवा करण्याचा आशीर्वाद मिळावा”- डॉ.नीलमताई गो-हे यांचे दगडूशेठ गणपतीस मागणे-संकल्प.

26 Jul 2021

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा,उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त शिवसेनेच्या वतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीस ६१ किलोचा माव्याचा मोदक अर्पण करण्यात आला.व महाआरती करण्यात आली. या प्रसंगी भगवान गणेशांना मागणे - संकल्प करतांना डॉ गो-हे यांनी देवाचे आभार मानले. तसेच  “उद्धवजी ठाकरे यांना दीर्घायुरारोग्य मिळावे,उद्धवजी ठाकरे यांनी हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार केले.परंतु सर्व जग,महाराष्ट्र,पुणे मुंबई अशा सर्वत्र विनाश करणार्‍या महामारी व संकटातून मुक्तता मिळावी,कोरोना महामारी व आताच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मरण पावलेलयांच्या आत्म्यास शांति मिळो,तसेच या सर्व आपत्ती ग्रस्तांचे योग्य पुनर्वसन व्हावे व सेवा करण्याचे  बळ मा.उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे,व सरकारला मिळावी.कोरोना परिस्थितीतून मार्ग मिळावा,अशी प्रार्थना केली.या प्रसंगी रवींद्र मिर्लेकर,संपर्क प्रमुख बाळाभाई कदम ,शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे,गजानन थरकुडे,राजेंद्र शिंदे,अशोक हरणावळ,नगरसेविका पल्लवी जावळे,संगीता ठोसर,उपशहर प्रमुखा बाळासाहेब मालुसरे,सुदर्शना त्रिगुणाईत,अमृत पठारे,प्रभाग समन्वयक नागेश खडके,मकरंद पेटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

छायाचित्र :मोदक अर्पण करतांना मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite