Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब विजडमचे अध्यक्षपदी हेमंत पुराणिक

27 Jul 2021

रोटरी क्लब विजडमचे अध्यक्षपदी हेमंत पुराणिक यांची निवड करण्यात आली. त्यांनी मावळते अध्यक्ष राहुल चौधरी यांचेकडून सूत्रे स्वीकारली॰ सचिवपदी स्वाती हिर्लेकर यांची तर खजिनदारपदी आशा मेडसिकर यांची निवड करण्यात आली. तसेच क्लब कार्यकारिणी अन्य पदाधिकारी यांची पण निवड करण्यात आली. हा कार्यक्रम पुण्याई सभागृह येथे पार पडला. या कार्यक्रम प्रसंगी प्रांतपाल पंकज शहा,सहाय्यक प्रांतपाल संदीप विळेकर,तसेच डिस्ट्रिक्ट कमिटी डायरेक्टर्स व क्लब सदस्य उपस्थित होते. नवनिर्वाचित अध्यक्ष हेमंत पुराणिक यांनी आगामी काळात रोटरीच्या सात सेवा कार्य विभागातील आरोग्य,पाणी,महिला सबलीकरण अंतर्गत विविध प्रकल्प राबविणार असल्याचे संगितले. 

छायाचित्र :हेमंत पुराणिक 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite