Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब हडपसर सेंट्रलच्या अध्यक्षपदी संपत खोमणे.

27 Jul 2021

रोटरी क्लब हडपसर सेंट्रलच्या अध्यक्षपदी रो.संपत खोमणे यांची निवड करण्यात आली.त्यांनी मावळते अध्यक्ष रो.मेहुल चिमठानकर यांच्याकडून सूत्रे स्वीकारली.सेक्रेटरीपदी रो.दिपककुमार गायके यांची तर खजिनदारपदी रो.आरती कदम यांची निवड करण्यात आली. चिनारबँन्क्वेट हॉल येथे झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डिजीएन डॉ.अनिल परमार होते.कार्यक्रम प्रसंगी रो.महेंद्र लुणिया,रो.वामन भुरे,रो.रंजन पराडकर,रो.शारदा लुणिया आदि मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष संपत खोमणे म्हणाले आगामी काळात देवराई प्रकल्प ज्यात एका एकर मध्ये ५०० झाडे लावण्यात येतात ते प्रकल्प व इतर समाजोपयोगी प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे संगितले.

छायाचित्र : संपत खोमणे.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite