Peoples Media Pune header

Go Back

पोलिस बॉईज ऑर्गनायझेशन,महाराष्ट्र राज्यच्या राज्य अध्यक्षपदी आशिष साबळे पाटील यांची निवड.

27 Jul 2021

पोलिस बॉईज ऑर्गनायझेशन,महाराष्ट्र राज्य या पोलिसांसाठी काम करणार्‍या संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी युवा नेतृत्व आशिष साबळे पाटील यांची निवड करण्यात आली. ते स्वारगेट पोलिस कॉलनी येथील गणेश मंडळाचे कार्यकर्ते आहेत. संघटनेच्या आजी – माजी पदाधिकारी व सदस्यांच्या बैठकीत हा ठराव संमत झाला. आशिष साबळे पाटील हे गेली अनेक वर्ष पोलिस कर्मचारी यांचे विविध विषय हाताळत असून त्यांनी पोलिसांची बाजू सर्व संबंधित ऑफिस व व्यक्ति यांचे समोर समर्थपणे मांडली आहे. आशिष साबळे हे स्वता: पोलिस पाल्य (लाईन बॉय) असून त्यांची ओळख चांगली आक्रमक व मनमिळावू अशी आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून त्यांनी आगामी काळात पिंपरी-चिंचवड,पुणे जिल्ह्यात संघटना बांधणी,पोलिसांना येणार्‍या अडीअडचणी व त्रास दूर करणे,व ही संघटना त्यांची ताकद बनवू असे संगितले.   

छायाचित्र :आशिष साबळे पाटील. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite