Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब डेक्कनच्या वतीने वाजेघर येथे नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न.

21 Aug 2021

दुर्गम अशा वाजेघर गावात रोटरी क्लब डेक्कनच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांची  नेत्रतपासणी व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात नेत्रतपासणी,मोफत मोतीबिंदू ऑपरेशन,मधुमेह तपासणी (रक्तशर्करा),रक्तदाब,ईसीजी आदींचा समावेश होता.या शिबिरात सुमारे १०५ नागरिकांनी सहभाग घेतला.गरजू रुग्णांसाठी वाहन व्यवस्था ही केली होती. या कार्यक्रम प्रसंगी. रोटरी क्लब डेक्कनचे अध्यक्ष रो.शिरीष पिंगळे,रूपा पिंगळे,          रो.संजय दापोडीकर,जया दापोडीकर,प्रियंका दापोडीकर आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ.पुरुषोत्तम जोगळेकर,डॉ.अरुण निरंतर,डॉ.रवींद्र कोलते,डॉ.अलका निरंतर यांनी रुग्ण तपासणी केली. नेत्र तपासणी झालेल्या १०० रूग्णांपैकी २३ रुग्णांवर जनकल्याण नेत्रपेढी द्वारे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली.

छायाचित्र :शिबीर प्रसंगी मान्यवर व डॉक्टर्स. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite