Peoples Media Pune header

Go Back

*मोनिका खिलानीने जिंकला ‘क्लासिक हेरीटेज इंडिया' किताब*

02 Sep 2021

*मोनिका खिलानीने जिंकला ‘क्लासिक हेरीटेज इंडिया' किताब* शैक्षणिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुण्यात नुकतीच ‘मिस हेरिटेज इंडिया’ हि सौदर्यवतींची स्पर्धा मोठ्या थाटामाटात पार पडली. या स्पर्धेचे आयोजन मृणाल एंटरटेंटमेंटच्या वतीने करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये भारतातील विविध सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता. मिस हेरिटेज इंडिया व मिसेस हेरिटेज इंडिया / क्लासिक हेरिटेज इंडिया अशा स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेमध्ये “क्लासिक हेरीटेज इंडियाचा” मोनिका खिलानी यांनी किताब पटकावला. त्याचं मनोगत व्यक्त करताना त्या म्हणाल्या कि ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा पुढे नेण्यासाठी आंतराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व मी लवकरच करणार आहे. या वेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अभिनेत्री हेमांगी कवी आदींनी मुकुट डोक्यावर घालून खिलानी यांचं कौतुक केले. या स्पर्धेत परीक्षण निर्माती पूनम शेंडे, डॉ. गौरी चव्हाण, मयुरेश डहाके, आरती बलेरी यांनी परीक्षक म्हणून काम केले. तर सूत्रसंचालन सिमरन आहुजाने केले.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite