Peoples Media Pune header

Go Back

मार्व्हल ऑटोटेकचे उद्घाटन डॉ.बाबा आढाव यांच्या हस्ते संपन्न.

02 Sep 2021

ऑटो रिक्शा व वाहतूक टेम्पो याचे शोरूम असलेल्या मार्व्हल ऑटोटेकचे उद्घाटन महाराष्ट्र माथाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ.बाबा आढाव यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रम प्रसंगी मार्व्हल ऑटोटेक शोरूमचे चालक धिरेन शहा,पुणे सिटी ऑटोरिक्शा प्रेसिडेंट राजेंद्र भावे, डिलर डेव्हलपमेंट हेड पार्थो बोस,रिजनल मॅनेजर महाराष्ट्र सचिन वासनिक,सर्व्हिस हेड जयंत वैद्य,टेक्निकल हेड सुशील देशपांडे,महाराष्ट्र राज्य सर्व्हिस हेड फारूक मुल्ला,महाराष्ट्र राज्य  सेल्स ऑफिसर सुनील वाघमोडे आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना डॉ.बाबा आढाव यांनी सध्याच्या रस्त्यांची स्थिति पाहता त्या प्रमाणे वाहने उत्पादित झाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. राजेंद्र भावे यांनी रिक्शा इलेक्ट्रिक वर झाल्यास योग्य होईल असे संगितले. धिरेन शहा यांनी सर्व ग्राहकांना योग्य त्या सेवा दिल्या जातील असे सांगितले.  

छायाचित्र :चावी ग्राहकांना हस्तांतर करताना बाबा आढाव,धिरेन शहा व अन्य.  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite