Peoples Media Pune header

Go Back

रोटरी फॉरच्यूनच्या वतीने गरजू नागरिकांना मिठाई वाटप.

14 Sep 2021

गणरायाचे आगमन झाल्याने गोडधोड पदार्थ सर्वच बनवत आहेत. मात्र अनेक निराधार गरजू यापासून दूरच राहतात. यासाठी रोटरी क्लब पुणे फॉरच्यूनच्या वतीने फरासखाना येथील शिवभोजन केंद्र येथील ३५० लाभार्थीना मिठाई वाटप केले. या प्रसंगी रोटरी क्लब फॉरच्यूनचे अध्यक्ष रो.असित शहा,संस्थापक अध्यक्ष रो.दीपक तोष्णीवाल,शिवभोजन केंद्र चालक दत्ताभाऊ जाधव,सुमित जाधव उपस्थित होते. या प्रसंगी सणासुदीला गरिबांच्या मुखात गोड घास जावेत या हेतूने उपक्रमाचे आयोजन केल्याचे असित शहा यांनी नमूद केले. 

छायाचित्र : डावीकडून असित शहा,दीपक तोष्णीवाल,सुमित जाधव. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite