Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब डेक्कनच्या वतीने स्वारगेट बस स्थानक येथे ११० कुंड्या रोपांसहित प्रदान

02 Oct 2021

रोटरी क्लब डेक्कनच्या वतीने स्वारगेट बस स्थानक येथे मोठ्या शोभीवंत रोपांसह ११० मोठ्या कुंड्या प्रदान करण्यात आल्या. स्वारगेट आगार येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी नियोजित प्रांतपाल रो.मंजु फडके,रोटरी क्लब डेक्कनचे अध्यक्ष रो.शिरीष पिंगळे,पी आय डायरेक्टर डॉ.अमित आंद्रे,गार्डन्स निडचे संचालक गौतम मल्होत्रा व भावना मल्होत्रा,आगार व्यवस्थापक सचिन शिंदे,स्थानक प्रमुख पल्लवी पाटील,आगार लेखागार सहस्र भोजणी आदि मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना मंजु फडके यांनी बस स्थानक हे शहराचा चेहरा असतो. असंख्य लोकांची ये जा असणार्‍या या संस्थेसाठी आणखी काही आवश्यकता असल्यास जरूर ती मदत केली जाईल असे संगितले.शिरीष पिंगळे यांनी बोलताना अत्यंत धकाधकीचे कार्य असलेल्या या ठिकाणी हिरवाई मुळे आकर्षकता व जीवनावश्यक ऑक्सीजन मिळत राहील असे संगितले.सचिन शिंदे यांनी या स्थानकात रोज सुमारे १३०० ते १४०० बस ये जा करतात व सुमारे ४० ते ४५ हजार लोक प्रवास करतात असे संगितले व या कुंड्यांची योग्य निगा राखली जाईल असे संगितले.व या मुळे पुणे बस स्थानकाची शोभा वाढल्याचे संगितले.  

छायाचित्र :उद्घाटन प्रसंगी मान्यवर. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite