Peoples Media Pune header

Go Back

*लस एक संजीवनी असून वैद्यकीय प्रसाद; डॉ नीलम गोऱ्हे यांचे प्रतिपादन* *चाकण औद्योगिक आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचे स्त्री आधार केंद्राच्या वतीने मोफत लसीकरण*

03 Oct 2021

महाराष्ट्रच नव्हेतर देशातच महिलांची संख्या लसीकरणात करण्यात कमी आहे. ती संख्या वाढावी यासाठी महिलांना लस देण्याची आवश्यकता लक्षात घेऊन, स्त्री आधार केंद्रच्या वतीने महाराष्ट्रातील कामगार महिलांचे मोफत लसीकरण मोहीम सुरू केली आहे. लस एक संजीवनी असूनज्या प्रमाणे मारुती रायांनी संजीवनी बुटी आणून लक्ष्मणांचे प्राण वाचविले त्याच प्रमाणे लस ही  एकप्रकारे वैद्यकीय प्रसाद तुम्ही घेत आहात. लस घेणे आणि देणे एवढा स्त्री आधार केंद्र आणि तुमचा संबंध नसून भविष्यात अनेक ठिकाणी महिलांच्या हक्कासाठी उभी राहणारी संस्था आहे. तसेच येत्या काही दिवसांनी महिलांसाठी आरोग्य शिबीर देखील आयोजित करू असा विश्वास डॉ नीलम गोऱ्हे यांनी दिला. राज्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट सीएसआर निधीच्या माध्यमातून स्त्री आधार केंद्र, पुणे यांनी हाती घेतले आहे. त्याच अनुषंगाने चाकण ता.खेड जि. पुणे येथील औद्योगिक आणि असंघटित क्षेत्रांत काम करणाऱ्या महिलांचे  कोरोनाच्या प्रतिबंधासाठी असलेली कोव्हीशिल्ड लस मोफत देण्याचा शुभारंभ आज रविवार रोजी उद्घाटन महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलमताई गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी, अपर्णा पाठक, डॉ.दीपक कोठारी, शिवसेना महिला आघाडीच्या सहसंपर्कप्रमुख विजया शिंदे, माजी नगराध्यक्ष राजू शेठ गोरे, उपजिल्हाप्रमुख शिवाजी वरपे, श्री नितीन शेठ गोरे, गणेश सांडभोर,आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविंद्र खेबुडकर यांनी तर आभार गोरे यांनी मानले. *डॉ. गोऱ्हे म्हणाल्या,* स्व.आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चाकण परिसरात वाचनालय व महिलांसाठी मोफत आभ्यासीका करावी असा प्रस्तावया वेळी व्यक्त केला, व या कार्यासाठी १० लाखचा निधी देण्याचे आश्वासित केले. तसेच वाचनालय व आभ्यासीकेच्या जागा उपलब्धते करिता  चाकण नगरपरिषदेची देखील मदत आपल्याला लागेल असे ही त्या म्हणाल्या. कार्यक्रमाच्या नंतर  नीलमताई गोऱ्हे यांनी गोरे कुटुंबीयांची भेट घेतली.  

छायाचित्र :लसीकरणकार्यक्रम  प्रसंगी नीलमताई गो-हे व अन्य  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite