Peoples Media Pune header

Go Back

स्व.शरदभाई शहा यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध उपक्रम.

06 Oct 2021

जैन सोशल इंटरनॅशनलचे माजी अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते स्व.शरदभाई शहा यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त जैन सोशल ग्रुप पुणे परिवाराच्या वतीने वासुदेव प्रतिष्ठान गोशाळा येथे आर्थिक मदत करण्यात आली. प्रा फाउंडेशन या मुलांच्या संस्थेस आर्थिक मदत व वस्तु वाटप करण्यात आले. तसेच २५ गरजू कुटुंबांना किराणा किट वाटप करण्यात आले. या प्रसंगी नवीन शहा,प्रकाश शहा,युवराज शहा,बिरेन शहा,मनेश शहा,दिलीप मेहता,हसमुख जैन,दिलीप चोरबेले रणजीत शहा,सौरभ शहा ,प्राजक्ता फाउंडेशनच्या प्राजक्ता कोळपक,कुमार शहा आदी मान्यवर उपस्थित होते. स्व.शरदभाई शहा सामाजिक कार्यकर्ते होते. म्हणून त्यांचा पुण्यस्मरण दिन हा समाजोपयोगी कार्याने व्हावा या हेतूने या उपक्रमाचे आयोजन केल्याचे राजीव शहा यांनी नमूद केले.

छायाचित्र :पुण्यस्मरण दिना निमित्त सामाजिक कार्य प्रसंगी मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite