Peoples Media Pune header

Go Back

तनिष वेंकटेश ह्या अवघ्या १४ वर्षांच्या मुलाने नुकतेच 'मराठा साम्राज्य' हे पुस्तक लिहिले व प्रकाशीतही केले.

08 Oct 2021

तनिष वेंकटेश ह्या अवघ्या १४ वर्षांच्या मुलाने नुकतेच 'मराठा साम्राज्य' हे पुस्तक लिहिले व प्रकाशीतही केले. मराठा साम्राज्याचा प्रेरणादायी व उज्वल इतिहास हा नवीन पिढीला माहीत व्हावा म्हणून तनिष ने हे पुस्तक लिहायचे ठरवले. रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रज तर्फे नुकतेच त्याचे ह्या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. "शालेय इतिहासाच्या पुस्तकात प्रामुख्याने दिल्ली सुलतान, मुगल व ब्रिटिशराज यांचा इतिहास शिकवला आहे. भारताच्या गौरवशाली इतिहासातील मराठा, शीख, चोला, विजयनगर, आहोम या भारतीय साम्राज्यांबद्दल फारशी माहिती नाही." असे तनिष ह्याने ह्या प्रसंगी सांगितले. पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज ते माधवराव पेशवे हा सुमारे १५० वर्षांचा इतिहास संक्षिप्त स्वरूपात पण महत्वाच्या सर्व घटना समाविष्ट करून लिहिला आहे. पुस्तकातील चित्रेही त्याने स्वतःच काढून ते प्रसंग जिवंत करायचा प्रयत्न केला आहे. सदर पुस्तक हे इंग्रगीत लिहिले असून विक्रीसाठी ऍमेझॉन वर उपलब्ध आहे. पुणे शहरातील अनेक शाळांमध्ये असे व्याख्यान करणार असल्याचे तनिष ह्याने सांगितले आहे.अशी माहिती रोटरी क्लब कात्रज चे अध्यक्ष पुष्कराज मुळे यांनी नमूद केले.  

छायाचित्र : कु तनिष वेंकटेश

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite