Peoples Media Pune header

Go Back

भेकराई नगर येथील पीडितेच्या कन्यांचे ना. डॉ.नीलमताई गोऱ्हे यांनी केले अनोखे कन्या पूजन.

14 Oct 2021

शारदीय नवरात्रोत्सवात कन्या पूजन करण्याची प्राचीन परंपरा आहे.भेकराईनगर येथील पिडीत कुटुंबातील छोट्या कन्यांचे भेटवस्तू,खाऊ देऊन अनोखे कन्या पूजन विधान परिषद उपसभापती ना.डॉ.नीलमताई गोऱ्हे यांनी केले.भेकराईनगर येथील रहिवाशी असलेल्या  भाग्यश्री जाधव  या महिलेला सहा मुली झाल्या म्हणून कुटुंबियांच्यावतीने शारीरिक व मानसिक त्रास देण्यात येत होता.जामीन मिळाल्यानंतरही अत्यंत निर्दयीपणे मारहाण करणार्या पतीला मिळालेला जामीन वरच्या कोर्टात जाऊन नामंजूर  करण्यात यावा.यासाठी आम्ही आग्रही राहू. आम्ही सर्व जण आपल्या सदैव सोबत आहोत.अशा शब्दांत पीडित महिलेची भेट घेत विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या महिलेला आश्वस्त केले.     भेकराईनगर येथील भाग्यश्री जाधव या महिलेला  सहा मुली झाल्या.तुला मुलगा का होत नाहीत असे म्हणत वारंवार मारहाण व मानसिक त्रास देणार्या पीडित महिलेच्या पतीला कोर्टाने २०१८ साली जामीन मंजूर केला.मात्र तरीही तिचा पती वारंवार  तिच्या घरी येऊन मारहाण करीत आहे.अशी माहिती  शिवसेनेच्या  प्रवक्त्या, उपनेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती  नीलम गोऱ्हे यांना मिळाली.आज या पीडित महिलेची भेट घेऊन आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुम्हाला कायदेशीर  मार्गाने  न्याय मिळवून देऊ.याबाबत पोलिस आयुक्त यांना यांना पत्रव्यवहार करणार आहोत.वारंवार मारहाण करणार्या पतीचा जामीन नामंजूर व्हावा यासाठी न्यायालयात दाद मागण्यात येईल. त्या पीडित महिलेच्या मुलींना शिक्षणासाठी  सर्वतोपरी मदत करण्यात येईल .अशा शब्दांत नीलम गोऱ्हे यांनी पीडित महिलेला मानसिक आधार दिला.आज त्यांनी पीडित महिलेच्या मुलींना भेटवस्तू देऊन त्यांचे कन्यापूजन केले.याप्रसंगी शिवसैनिक बाळासाहेब हरपळे,सतीश जगताप, रुपेश मोरे यांनी महिलेला आर्थिक सहकार्य केले.शिवसेनेच्या नगरसेविका प्राची आल्हाट,पुरंदर हवेली विधानसभा प्रमुख शंकर हरपळे, स्त्री आधार केंद्राचे शेलार गुरुजी,अश्विनी शिंदे,अॅडव्होकेट प्रणिती मोकाशी,युवासेनेचे शादाब मुलानी,ज्ञानेश्वर कामठे ,दत्ता राऊत,सविता ढवळे, मयूर शिंदे, धिरज गायकवाड ,चेतन शेवाळे ,पंकज भारती,आदी कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite