Peoples Media Pune header

Go Back

डायबेटीस दिना निमित्त रोटरी टिळक रोडच्या वतीने “डायबेटीस पंधरवाड्याचे ” आयोजन. व रक्तशर्करा तपासणी शिबीर.

14 Nov 2021

मधुमेह-डायबेटीस या विकाराचा प्रसार देशात मोठ्या प्रमाणे होत आहे. आज जागतिक मधुमेह दिन या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ टिळक रोड च्या वतीने आजपासून पुढचे पंधरा दिवस “डायबेटीस-मधुमेह पंधरवाडयाचे  उद्घाटन करण्यात आले. सिनसान संस्था संचालित मीरा मल्टिस्पेशलिटी रुग्णालय येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रोटरी प्रांतचे डिसीज प्रिव्हेनशन अँड ट्रीटमेंटचे डायरेक्टर रो.डॉ.देवीदास भालेराव,रोटरी क्लब टिळक रोडच्या अध्यक्ष रो.अपर्णा क्षीरसागर,सेक्रेटरी चारुदत्त भावे,मेडिकल डायरेक्टर संजीव कुलकर्णी,सिनसानचे महेंद्र जैन,डॉ.अनिकेत ओसवाल,डॉ.सतीश चव्हाण,डॉ.प्रसाद पिंपळखरे,रो.महेश डबीर. आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ.सतीश चव्हाण यांनी मधुमेह आपल्याला झाला आहे हेच अनेक लोकांना समजत नाही.हा रोग नियमित औषदे व योग्य आहार विहार,तणावमुक्त मन यांनी नियंत्रांत राहतो.रो.अपर्णा क्षीरसागर  यांनी ही मोहीम १५ दिवस सुरू राहणार असल्याचे संगितले.  

छायाचित्र : अपर्णा क्षीरसागर,देवीदास भालेराव व अन्य मान्यवर. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite