Peoples Media Pune header

Go Back

*छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवाची परंपरा अजून समृद्ध, सुदृढ, शक्तिशाली बनवण्यासाठी सर्वांनी काम करणं हीच बाबासाहेब पुरंदरे यांना खरी श्रद्धांजली ठरेल.... डॉ.नीलम गोऱ्हे*

15 Nov 2021
सर्व शिवप्रेमींना अत्यंत दुःख होईल अशी धक्कादायक असे बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन झालेला आहे. शिवशाहीर म्हणून जनमानसामध्ये ओळखणारे बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांचे आयुष्य संपूर्ण पणाने छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित केलं. देश धर्म आणि देवासाठी म्हणून त्यांनी समर्थ रामदास स्वामींच्या उक्तीप्रमाणे वेगळ्या प्रकारचा अभ्यास कृती केली त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाचे इतिहासाच्या पानावर संपुर्ण कार्य आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक मातीच्या कणावर व प्रत्येकाच्या अस्मितेशी जोडले गेलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे विशाल महाकाय अशा कार्याचे दर्शन मा. बाबासाह्ब पुरंदरे यांनी साहित्यातून आणि कलेतुन घडवले. त्यासाठी त्यांनी अनेक पुस्तके व चरित्र लिहिले संपूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजांचे साहित्य, छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे अजरामर होईल अशा प्रकारचा त्यांनी योगदान देऊन स्वतःचे जीवन समर्पित केलं. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचा अतिशय अकृत्रिम स्नेह होता, लोभ होता. बाबासाहेब पुरंदरे यांची बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल अत्यंत ममत्वाची भूमिका होती. अनेक वेळेला त्यांचा संवाद होत असे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे यांनी सुद्धा त्यांना वेळोवेळी भेट देऊन अनेक बाबतीमध्ये त्यांचे मार्गदर्शन घेतलं होतं, आशीर्वाद घेतले होते. दरवर्षी वाढदिवसाला बाबासाहेब पुरंदरे यांना भेटायचे हा माझा शिरस्ता होता. अनेक वर्षे मी त्याना कार्यक्रमात भेटत होते प्रत्येक वेळेला आमदार झाल्यावर किंवा एखादी मोठी घटना घडल्यानंतर त्यांचा एक वाक्य असायचा ''अहो किती दिवसात तुम्ही भेटल्या नाहीत" नुकतीच भेटले असले तरी परत त्यांना भेटावे असे त्यांना वाटत असे. काही दिवसांपूर्वी राज्यापालांच्या हस्ते जीवनगौरव सत्कार झालेला होता. त्यावेळेला मला ही वेगळ्या प्रकारचा पुरस्कार देण्यात आला होता. त्यावेळेला आम्ही भेटलो आणि त्यावेळी नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेण्याची संधी प्राप्त झालेली होती. आजारपणामुळे त्यांचं आज निधन झालं असलं तरीसुद्धा त्यांच्या स्मृती, त्यांनी उभारलेली शिवसृष्टी या सगळ्याला आमची चांगल्या प्रकारचे बांधिलकी आहे. पुढच्या काळामध्ये त्यांनी केलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवाची परंपरा अजून समृद्ध, अजून सुदृढ, अजून शक्तिशाली बनवण्यासाठी आपण सर्वांनी काम करणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. त्यांचे कुटुंबीयांनी बाबासाहेब पुरंदरेंचची अपरिमित अशी काळजी घेतली, त्याच्या पाठीमागे उभे राहिले . बाबासाहेब पुरंदरे यांचा परिवार संपूर्ण महाराष्ट्रात देखील होता या पार्श्वभूमीवर सगळ्या महाराष्ट्राला दुःख झाले आहे. इतकेच नव्हे तर एक शिवसृष्टीमधील एक प्रकाशमान तारा निमालेला आहे. या भावपूर्ण शब्दामध्ये महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी त्यांची श्रद्धांजली व्यक्त केली

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite