Peoples Media Pune header

Go Back

कु. आर्या आनंद खैरनार पुणे हीने प्रतिष्ठेचा “टाईम्स फ्रेश फेस सीजन १३” हा पुरस्कार मिळवून पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला

22 Nov 2021

कु. आर्या आनंद खैरनार, पुणे हीने प्रतिष्ठेचा “टाईम्स फ्रेश फेस सीजन १३” हा पुरस्कार मिळवून पुण्याच्या शिरपेचात मानाचातुरा रोवला  . देशभरातील सर्व महाविद्यालयांतून जवळपास ९० हजार विद्यार्थ्यांनी ह्या चुरशीच्या स्पर्धेतून आपले गुणदर्शन केले. अंतिम स्पर्धा मुंबईच्या ताज हॅाटेल येथे दि. नोव्हेंबर २०२१ रोजी झाली. प्रसिद्ध अभिनेत्री रकूलप्रित कडून पारितोषिक देण्यात आले.
कु. आर्याचा तीच्या आय आय एच एम, विमान नगर ह्या महाविद्यालयात दि. २० नोव्हेंबर २०२१ रोजी अत्यंत नेत्रदीपक असा सत्कार समारंभ करण्यात आला. त्यात सर्व विद्यार्थ्यांनी सुंदर सजावट, विवीध गुणदर्शन आणि सुग्रास नाष्टा देऊन कार्यक्रम संस्मरणीय केला.
कु. आर्या च्या ईच्छेनुसार तीचे शिकाऊ शिक्षणाचे पैसे “माई बालभवन” ह्या संस्थेस देण्यात आले.
अशा प्रकारे तीने समाजसेवेचे भानदेखील जपले.
कार्यक्रमास मिसेस इंटरनॅशनल क्विन २०१८ सौ. गीतांजली खैरनार, विद्यापीठ संचालक रुपिंदर खुराना, संगिता भट्टाचारजी, सर्व शिक्षकगण, माई बालभवन चे संचालक व विद्यार्थीनी आणि आर्याचा परिवार उपस्थित होते.

छायाचित्र: आर्या खैरनार,मान्यवर व विद्यार्थी यांचे समूह चित्र 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite