Peoples Media Pune header

Go Back

राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या वतीने “मोफत लस आपलया दारी” मोहीमेचे आयोजन.

27 Nov 2021

राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी पुणे शहरच्या वतीने विलु पूनावाला यांच्या संयुक्त विद्यमाने घरोघरी मोफत लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले. यात अखिल सदाशिव पेठ नवरात्र उत्सव,चिमण्या गणपती जवळ,लक्ष्मीरोड विजय टॉकीज जवळ आणि पायगुडे ऑटोमोबाईल जवळ हे लसीकरण करण्यात आले. शनिवार,शुक्रवार व नारायण पेठ येथील वृद्ध ज्येष्ठ नागरिक,दिव्यांग यांचे लसीकरण फिरत्या व्हॅन द्वारे करण्यात आले. यात सुमारे ४२५ नागरिकांनी लाभ घेतला. या कार्यक्रम प्रसंगी आयोजक राहुल पायगुडे(सरचिटणीस राष्ट्रवादी कॉग्रेस पुणे शहर),प्रशांत जगताप (राष्ट्रवादी कॉग्रेस पुणे शहर अध्यक्ष),अरुण गवळे(संघटक सचिव राष्ट्रवादी कॉग्रेस पुणे शहर),अजिंक्य पालकर(अध्यक्ष कसबा युवक राष्ट्रवादी कॉग्रेस),रोहन पायगुडे,गणेश नलावडे,नीलेश वरे,माधुरी काटे आदी मान्यवर उपस्थित होते. ही मोहीम २६ -२७ २८ नोव्हेंबर राबविण्यात येईल असे राहुल पायगुडे यांनी नमूद केले. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite