Peoples Media Pune header

Go Back

विशेष मुलांनी घेतला सायकलिंगचा आनंद.

29 Nov 2021

आर डी एक्सट्रीमर्स स्पोर्ट्स क्लब बाय रुजेता देडगे या विशेष मुलांसाठी काम करणार्‍या संस्थेच्या वतीने विशेष मुलांसाठी सायकलिंग उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र मंडळ मुकुंद नगर येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी आयोजक रूजेता देडगे,स्पेशल ऑलिंपिक २०१५ चे सायकलिंग ब्रांझ पदक विजेते भरत पाटील,आदी मान्यवरांच्या बरोबरच  ४ ते १४ वयोगटातील सहभागी २५ मुले मुली आणि त्यांचे पालक,स्वयंसेवक उपस्थित होते. सर्व सहभागी मुला मुलींना पदक व प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच आल्पोपहार देण्यात आला. विशेष मुला मुलींना सायकल चालवणे हे थोडे अवघडच असते.यासाठी त्यांना प्रोत्साहन व प्रशिक्षण मिळावे,सायकलिंगचा आनंद घेता यावा यासाठी या उपक्रमाचे आयोजन केल्याचे रूजेता देडगे यांनी नमूद केले.

छायाचित्र :विशेष मुलांचा सत्कार करताना रूजेता देडगे व भरत पाटील. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite