Peoples Media Pune header

Go Back

डॉ. अभिजीत सोनवणे यांना सर्विस अॅवॉर्ड

01 Dec 2021

डॉ. अभिजीत सोनवणे यांना सर्विस अॅवॉर्ड रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगर च्या मीटिंग मध्ये नुकताच  डॉ अभिजीत सोनवणे यांना सर्व्हिस अवॉर्ड देण्यात आले. डॉ. स्मिता जोग ह्यांनी त्यांची व ह्या कार्यात त्यांना संपूर्ण मदत करणाऱ्या त्यांच्या सौ. डॉ. मनीषा सोनवणे ह्यांची मुलाखत घेतली. कॉर्पोरेट जगतातील एका उच्च पदावर काम करत असताना त्याचा त्याग करून त्यांनी हा मार्ग का निवडला, त्यात त्यांना कोणा कोणाची साथ मिळाली आणि हे काम त्यांना का करावेसे वाटते अशा सर्व प्रश्नांची त्यांनी मनापासून उत्तरे दिली. त्यांचा रोजचा दिनक्रम म्हणजे निरनिराळ्या देवळांच्या बाहेर बसलेल्या भिकाऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा देणे हाच आहे. आज पुणे शहरातल्या ११०० पेक्षा जास्त भिकाऱ्यांना त्यांनी मोफत वैद्यकीय सेवा देवून त्यांचे पुनर्वसन केले आहे. भीक देवू नका त्या पेक्षा त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत करा असे आवाहन त्यांनी या मुलाखती द्वारे केले. प्रेसिडेंट डॉ.शोभा राव. सर्व्हिस डायरेक्टर डॉ. सूर्यप्रकाश राव , सेक्रेटरी अजय गोडबोले पिडिजी. मुकुंद राव अभ्यंकर ह्या प्रसंगी उपस्थीत होते.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite