Peoples Media Pune header

Go Back

रोटरी प्रकल्पाने शिवापूर गावात शिवगंगा अवतरली.

02 Dec 2021

शिवापूर , पुण्यापासून 25 किलोमीटरवरील गाव. पण दरवर्षीच नोव्हेंबर / डिसेंबर पासून पाणीटंचाई. ज्ञान प्रबोधिनीच्या शिवापूर शाखेतून ही माहिती रोटरी क्लब ऑफ पुणे टिळक रोडच्या सदस्यांना कळली. मग जमिनीचा सर्व्हे करण्यापासून सुरवात झाली. गावातील एका दानशूर व्यक्तीने ( मधुकर दिघे ) आपल्याच शेतातील 2 एकर जमीन ग्रामपंचायतीला भेट दिली. सुदैवाने तेथे पाण्याचे झरे असल्याचे भूमीतज्ञाने सांगितले. त्या जमिनीत खड्डा करुन तेथे विहीर बांधली. त्यानंतर विहीर ते गावाची पाण्याची टाकी ह्या 2 किलोमीटर अंतरावर जमिनीखालून पाईप लाईन घालण्यात आली आहे. विहीरीवर पंप बसविण्यात आले आहेत. आणि मग ३० नोव्हेंबर २०२१ हा दिवस , आपल्या क्लबच्या स्वप्नपूर्तीचा दिवस ठरला आहे. शिवापूर येथील ग्रामस्थांना पाणी पुरवठा करण्यासाठी विहीर बांधून देण्याची योजना (प्रकल्प) कार्यन्वित झाली. अनेक अडचणींचा सामना करून किंवा त्या वर मात करून हा प्रकल्प पूर्ण झाला. आज त्या प्रकल्पाचा उदघाटन सोहळा पार पडला. या वेळी कै. श्रीकांत सरपोतदार व कै. कल्याणी मेंगळे यांची आठवण आल्यावाचून रहावत नाही. या प्रकल्पासाठी आपला क्लबचा सिंहाचा वाटा आहे. त्याचबरोबर फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि त्यांचे सीएसआर भागीदार मुकुल माधव फौंडेशन आणि दि पुणे टिळक रोड चॅरिटेबल ट्रस्ट यांचे अर्थ सहाय्य झाले. तसेच सरपोतदार आय हॉस्पिटल आणि उषःकाल प्रतिष्ठान , जिल्हा परिषद, ग्राम पंचायत शिवापूर आणि ग्रामस्थ शिवापूर, जय श्रीराम जेष्ठ नागरिक संघ, फिक्की फ्लो पुणे चॅप्टर (२०२०-२१) यांनीही अर्थसहाय्य केले. ज्ञान प्रबोधिनी पुणे यांच्या संकल्पनेची मदत झाली. या कार्यक्रमाचे उदघाटन प्रेसिडेंट अपर्णा क्षीरसागर यांच्या हस्ते झाले. आपल्या क्लबतर्फे प्रेसिडेंट अपर्णा व आण्णा उदय क्षीरसागर, सेक्रेटरी रो. पी.पी. चारू भावे, रो. सत्यजित व मंजिरी बडवे, रो. देवदत्त व मंजिरी हंबर्डीकर, रो.पी.पी. महेंद्र शाह, रो.पी.पी. संजीव करंजकर, रो.पी.पी. अनंत व मेधा सरदेशमुख, रो.पी.पी. दादा सावळे, रो.निर्मला सरपोतदार, रो. गिरीश व राधिका ब्रम्हे, रो. अतुल व अरुण अत्रे, रो.पी.पी. मोहनराव गुजराथी यांची उपस्थिती होती. तसेच वाडा शिवापूरचे अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. उदघाटनानंतर ग्रामस्थांनी रोटरीच्या सभासदांचा श्रीफळ व शाल देऊन सत्कार केला. नंतर अल्पोपहार घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite