Peoples Media Pune header

Go Back

स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीस आराम पडावा म्हणून डॉ.नीलमताई गो-हे व नवनियुक्त शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी यांनी केली दगडूशेठ गणपतीची महाआरती

17 Jan 2022

स्वर सम्राज्ञी गानकोकिळा लता मंगेशकर या कोरोना मुळे रुग्णालयात दाखल आहेत.त्यांच्या प्रकृतीस आराम पडावा यासाठी विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलमताई गो-हे,शिवसेना महिला आघाडीच्या नवनियुक्त पदाधिकारी व शिवसेना पदाधिकारी यांनी शिवसेना पुणे शहराच्या वतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती केली.या प्रसंगी डॉ.गो-हे यांनी  भारत रत्न लताताई मंगेशकर यांचे स्थान सर्व भारतीयांच्या आणि सर्वांच्या हृदयात असून त्यांची श्रद्धा,आणि माणुसकी,त्यांची कामावरची निष्ठा तसेच हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दलचा त्यांचा अकृत्रिम स्नेह लक्षात घेता या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे संगितले.तसेच या कार्यक्रमाची कल्पना मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे व रश्मिताई ठाकरे यांना असल्याचे संगितले. या कार्यक्रम प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे,गजानन ठरकुडे राजेंद्र शिंदे,निर्मला केंडे,स्वाती ढमाले,अमृता पठारे,सुदर्शना त्रिगुणाईत,सुलभा तळेकर,अश्विनी शिंदे,विद्या होडे,राहुल जेकटे,अनीता परदेशी,वैशाली दारवटकर,अरुणा पवार,स्मृति नाझरकर,मकरंद पेठकर,स्वाती कथलकर शिवा जगधणे आदी मान्यवर उपस्थित होते.  

छायाचित्र :महाआरती प्रसंगी नीलमताई गो-हे व अन्य मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite