Peoples Media Pune header

Go Back

शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त स्वच्छता अभियान व म.न.पा. सफाई कामगारांचा सन्मान

24 Jan 2022

शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त आज स्वच्छता अभियान व म.न.पा. सफाई कामगारांचा सन्मान शिवसेना चव्हाणनगर शाखेतर्फे, पर्वती विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक "पराग थोरात" यांच्या संयोजनाखाली सर्व पदाधिकारी व शिवसैनिक यांच्या सहयोगाने तिन हत्ती चौक येथे संपन्न झाला. "कोरोना काळात देखील म.न.पा.च्या सफाई कामगारांनी बजावलेले कर्तव्य कौतुकास्पद आहे" त्यांचा उचित सन्मान शिवसेनेच्यावतीने करण्यात आला. तसेच तळजाई वसाहत येथे पर्वती विभाग प्रमुख सचिन देडे व सर्व सहकाऱ्यांनी हा उपक्रम उत्साहाने राबवला. अनेक ठिकाणी असलेला कचरा शिवसैनिकांनी म.न.पा सफाई कामगारांच्या साथीने उचलला. तर शिवसेना महिला आघाडीच्या श्रूतीताई नाझीरकर यांनी रस्त्यावरील वस्तु विकणाऱ्या निराधार व्यक्तींना ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम शिंदे हायस्कूल चौकात आयोजीत करून रस्त्यावरील या उपेक्षित घटकाला माणुसकीचा हात दिला.या वेळी संयोजक श्री. पराग थोरात (समन्वयक - पर्वती विधानसभा मतदारसंघ), सचिन देडे (विभाग प्रमुख), सुरज खंडाळे ( उपविभाग प्रमुख), सुदीप कदम (शाखा प्रमुख), श्रुती नाझिर्कर (संघटिका), ज्योती विर (संघटीका), माऊली दारवटकर, रमेश जावळे, चंद्रकांत उपरे व पर्वती विधानसभा मतदारसंघाचे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite