Peoples Media Pune header

Go Back

सर्वपक्षीय मैत्रीपूर्ण क्रिकेट स्पर्धा कॉग्रेस टिमने जिंकली.

25 Jan 2022

सर्व पक्षीय- कॉग्रेस,शिवसेना,राष्ट्रवादी कॉग्रेस,भाजप,मनसे,आरपीआय,तसेच कलाकार व पत्रकार यांच्या संघांनी भाग घेतलेली मैत्रीपूर्ण क्रिकेट स्पर्धा कॉग्रेस पक्षाच्या टिमने जिंकली तर द्वितीय क्रमांक आर पी आय,शिवसेनेच्या टिमने तृतीय क्रमांक मिळविला. सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब दाभेकर व निरंजन दाभेकर (युवा सेना) यांनी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त याचे आयोजन केले. कटारीया हायस्कूल मैदान येथे संपन्न झालेल्या या स्पर्धा प्रसंगी महापौर मुरलीधर आण्णा मोहोळ,अंकुश काकडे(प्रवक्ते),शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे व गजानन थरकुडे,प्रशांत जगताप(राष्ट्रवादी कॉग्रेस शहर अध्यक्ष),मंदार जोशी(आरपीआय),गणेश भोकरे(मनसे),मा आ.महादेव बाबर,नगरसेवक विशाल धनवडे,नगरसेवक राजेश येणपुरे,माजी उपमहापौर दीपक मानकर,महेश वाघ,राजेंद्र पंडित,राजू आग्रवाल,अतुल परमार,अनिल येणपुरे आदी मान्यवर उपस्थित होते  

छायाचित्र :विजेती टिम व मान्यवर. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite