Peoples Media Pune header

Go Back

राम रहीम फ्रेंड सर्कलच्या वतीने रमजान ईद निमित्त सर्व धर्मीय नागरिकांना शिरखुर्मा वाटप.

04 May 2022

एन आय बी एम रस्ता येथील राम रहीम फ्रेंड सर्कलच्या वतीने सर्व जाती धर्माच्या नागरिकांना शिरखुर्मा वाटप करीत व शुभेच्छा देत रमजान ईद साजरी करण्यात आली. या प्रसंगी  राम रहीम फ्रेंड सर्कलचे संस्थापक अध्यक्ष सलीम हनीफ खान,अध्यक्ष प्रवीण शर्मा,राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशात जगताप,नंदाताई लोणकर,नारायण लोणकर,इकराम भाईजान,माजी आमदार महादेव बाबर,नगरसेवक तानाजी लोणकर,मोहसीन हसन शेख,हफीज शेख,फरीद खान,संजय कांबळे,शोएब शेख,समीर पठाण,अॅड.माने,कुमेल रझा,अस्लम बागवान,नूर शेख. आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध पदाधिकारी व नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना प्रशांत जगताप यांनी सध्या विविध जाती धर्मात तेढ वाढविण्याचा काही शक्ति प्रयत्न करीत आहेत.मात्र आपल्या देशातील सुज्ञ नागरिक त्यास बळी न पडता आपला सामाजिक सलोखा जपत आहेत व वाढवत आहेत असे संगितले. सलीम हनीफ खान यांनी सर्व जाती धर्मात सलोखा वाढावा यासाठी या उपक्रमाचे आयोजन गेले सोळा वर्ष करण्यात येत आहे असे संगितले.   

छायाचित्र : रमजान ईद साजरी करताना मान्यवर. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite