Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब फॉरच्यूनच्या वतीने पुणे रेल्वे स्टेशनला ३ व्हिल चेअर प्रदान.

18 May 2022

रोटरी क्लब फॉरच्यूनच्या वतीने पुणे रेल्वे स्टेशन येथील दिव्यांग अथवा रुग्ण प्रवाशी सेवेसाठी ३ व्हिल चेअर प्रदान करण्यात आल्या. या कार्यक्रम प्रसंगी स्टेशन डायरेक्टर एस.सी.जैन,रोटरी क्लब फॉरच्यूनचे संस्थापक अध्यक्ष दीपक तोष्णीवाल,रोटरी क्लब फॉरच्यूनचे अध्यक्ष असित शहा,भरत गुरव,हेमंत रसाळ आदी मान्यवरांच्या बरोबरच तेथील लायसेंसी पोर्टर- कुली उपस्थित होते.एस.सी.जैन यांनी पुणे रेल्वे स्टेशन येथून रोज सुमारे १ लाख पेक्षा अधिक प्रवाशांचे येणे जाणे होत असते असे संगितले. दीपक तोष्णीवाल यांनी दिव्यांग व रुग्ण प्रवाशांना सुलभ सेवा मिळावी यासाठी या उपक्रमाचे आयोजन केल्याचे संगितले.

छायाचित्र : एस.सी जैन,दीपक तोष्णीवाल व कुली यांचे समूह चित्र. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite