Peoples Media Pune header

Go Back

एपिलेप्सी- मिर्गी फिट रूग्णांच्या शस्त्रक्रिया मदतीसाठी वॉकेथॉनचे आयोजन.

24 May 2022

एपिलेप्सी म्हणजेच फिट येणे व त्यावेळी आकडी व झटके येणे या गरजू व गरीब रूग्णांच्या शस्त्रक्रिया मदतीसाठी रोटरी क्लब बाणेरच्या वतीने ५ किमी वॉकेथॉन “पर्पलथॉनचे” आयोजन केले आहे. हा कार्यक्रम रविवार दिनांक २९ मे २०२२ रोजी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे सकाळी ७.३० वाजता संपन्न होईल. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ.निलेश कुरवाळे-दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल,सहाय्यक प्रांतपाल बलविर चावला ,रोटरी क्लब बाणेरचे अध्यक्ष संकेत सराफ,सचिव अनिरुद्ध जोशी  समन्वयक प्रिया कारिआ,रोटरॅक्ट क्लब ऑफ  इंदिरा कॉलेज आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत असे समन्वयक कॅप्टन नाडकर यांनी नमूद केले आहे.तसेच या मदत कार्यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite