Peoples Media Pune header

Go Back

“पुणेरत्न उत्कृष्ट नृत्य व नृत्य दिग्दर्शक पुरस्कार २०२२”. आशुतोष संकाये पाटील यांना प्रदान.

06 Jun 2022

युवा अभिनेता आशुतोष संकाये पाटील यांना “पुणेरत्न उत्कृष्ट नृत्य व नृत्य दिग्दर्शक पुरस्कार २०२२” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जनकल्याण बहूउद्देशीय फाउंडेशन पुणे यांनी याचे आयोजन केले. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले,माजी पोलिस उपायुक्त महाराष्ट्र राज्य शहाजीराव पाटील यांच्या हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अण्णाभाऊ साठे सभागृह येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी श्रीपाल सबनीस,रूपाली चाकणकर,प्रशांत जगताप,शार्दुल जाधवर,मयूर अडागळे,बालाजी गौडगिरी व अन्य मान्यवर उपस्थित होते. पुणेरी पगडी,शाल,श्रीफळ,स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.   

छायाचित्र : डावीकडून शहाजीराव पाटील,आशुतोष संकाये पाटील,मेघराज राजेभोसले. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite