Peoples Media Pune header

Go Back

आयटीच संस्थेच्या विध्यार्थ्यांना उद्योगांनी सामावून घ्यावे याचसाठी केला होता अट्टाहास....

21 Jun 2022
आयटीच संस्था हि एक सामाजिक संस्था २०१५पासून पुणे येथे कार्यरत आहे. आयटीच संस्थेची स्थापनाच या कारणासाठी झाली की पुण्यातील गरीबातील गरीब मुलांना दर्जेदार माध्यमिक शिक्षण मिळावे व त्यांचे शाळेनंतर उच्च शिक्षणाच्या जगात यशस्वीपणे पदार्पण व्हावे. पुणे महानगरपालिके सोबत ८वी ते १०वी असे ३ वर्षे इंग्रजी माध्यमिक शाळा चालवून तर पुढे ५ वर्षे उच्च शिक्षण घेताना योग्य मार्गदर्शन व समूपदेशन करत, असे एकूण ८ वर्षे विध्यार्थ्यांसोबत काम केले जाते. शिक्षण हे एकमात्र शस्त्र गरिबीच्या दुष्ट चक्राला छेद देऊ शकते. "या मुलांनी केवळ माध्यमिक शिक्षण पूर्ण करावे हा आमचा हेतू नसून आयटीच संस्थेसोबत जोडलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा विकास व्हावा, त्यांनी उच्च शिक्षण घ्यावे, नोकरीसाठी त्यांची तयारी व्हावी व चांगल्या ठिकाणी कामाला लागून त्यांनी आपल्या परिवाराला गरीबीच्या चक्रातून बाहेर काढावे यासाठी आयटीच संस्था कार्यरत आहे." हे वर्ष आमच्यासाठी खूप विशेष आहे. आयटीच संस्थेच्या शाळांमधून २०१७ साली १०वी ची परिक्षा उत्तिर्ण झालेले ७२ विद्यार्थी यंदा विविध विषय व कॉलेजमधून ग्रज्युएट होऊन बाहेर पडत आहेत. या विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये माहिती, संसाधने, सकारात्मक आदर्श अशा अनेक गोष्टींचा आभाव असतो. कॉलेज कसे निवडावे, विषय व करिअर कसे ठरवावे, अड्चण आली तर कोणाची मदत घ्यावी, घरातील आर्थिक समस्यांमुळे अनेकदा या विद्यार्थ्यांचे शिक्षण अपूर्ण राहते. आज भारतामध्ये केवळ २६% युवक व युवती पध्वीधर शिक्षण पूर्ण करू शकत आहते. तर आपण विचार करू शकता की यामध्ये आर्थिक रित्या दुर्बल घटकामधील किती जण असतील. गेली ५ वर्षे आयटीच संस्थेच्या कॉलेज टू करिअर प्रकल्पाअंतर्गत या विद्यार्थ्यांसोबत विविध उपक्रम राबवले गेले आहेत. विध्यार्थ्यांना ऍडमिशन करिता मार्गदर्शन, कॉलेजची फी भरण्यासाठी शिष्यवृत्यांशी जोडून देणे, करिअर कौन्सेलिंग, इंटर्नशिप तसेच छोटी-मोठी कामे मिळवून देणे, कॉलेज/घरातील अड्चण प्रसंगी मुलांना व पालकांना कौन्सेलिंग, नोकरीच्या इंटरव्यूची तयारी करण्यासाठी कार्यशाळा, अभ्यासात मार्गदर्शन, कोविड्च्या काळात अभ्यास करण्यासाठी टेब, राशन, कोवीड्ची लस उपलब्ध करून देणे ते आता नोकरी शोधण्यासाठी मदत करणे असे व्यापक काम या विध्यार्थ्यांबरोवर वेळोवेळी झाले आहे. त्याच्याच परिणाम म्हणून यावर्षी आयटीच संस्थेचे विविध विध्यार्थी मोठ्या मोठ्या नामंकित कंपनी आणि संस्थांमध्ये नोकरीला लागले आहेत, जसे कि टीच फॉर इंडिया, विप्रो, डिजिट इन्शुरन्स इत्यादी. या वर्षी आम्ही या विद्यार्थांसोबत पहिलेली स्वप्न पूर्ण होताना दिसू लागली आहेत. मोईन शेख (नाव बद्दलेले) आयटीच संस्थेच्या औंध येथील शाळेतून २०१७ मध्ये १०वी ची परिक्षा उत्तम मार्कांनी पास झाला. आयटीच च्या मार्गदर्शनामुळे त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली. घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे मोईनने शाळेत व कोलेजमध्ये देखील पेपर टाखून आपले शिक्षण पूर्ण केले. मोईन सोबत आयटीच संस्थेने वारंवार काम केले, त्याला वेळोवेळो मदत केली आणि परिस्थिशी झुंज द्यायला शिकवले. आज मोईनला विप्रो अशा नामांकित कंपनीमध्ये नोकरी मिळाली आहे. वैष्णवी साठे, रोहन खुडे सारखे काही विध्यार्थी आता आमच्या संस्थेत कामाला लागले असून इतर किशोर वयीन मुला-मुलींना मार्गदर्शन करण्याचे काम करत आहेत. आमचे विध्यार्थी फक्त स्वतःचाच नाही तर भारताच्या विकासामध्ये प्रगती आणण्यासाठी कटिबद्ध आहेत आणि त्यासाठी त्यांना आम्ही तयार करत आहोत. त्यांना चांगल्या कामाच्या संधी मिळाव्या ह्यासाठी आम्ही पुण्यातील लोकाना आव्हान करत अहोत.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite