Peoples Media Pune header

Go Back

भालगुडी, ता. मुळशी. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये "भावना फाऊंडेशन" आणि "फिनिक्स लँडमार्क" यांच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

22 Jun 2022

भालगुडी, ता. मुळशी. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये "भावना फाऊंडेशन" आणि "फिनिक्स लँडमार्क" यांच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. "भावना फाऊंडेशन" व "फिनिक्स लँडमार्क" यांच्या माध्यमातून दरवर्षी मुळशी तालुक्यात अनेक सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी दुर्गम भागांतील शाळांमध्ये शालेय साहित्य वाटण्याचा उपक्रम या संस्थांनी हाती घेतला आहे, या उपक्रमाची सुरवात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भालगुडी येथून आज करण्यात आली. यावेळी गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना नेहमीच या संस्थेकडून मदत केली जाईल असे या संस्थांचे संस्थापक मा श्री सुनिल राठोड यांनी सांगितले. यावेळी "भावना फाऊंडेशन" व "फिनिक्स लँडमार्क" संस्थांचे संस्थापक व युवा उद्योजक मा श्री सुनिल राठोड, संस्थेचे अध्यक्ष मा श्री सुरज शिंदे, रा. यु. काँ. मु. ता. कार्याध्यक्ष मा. श्री विलास अमराळे सामाजिक कार्यकर्ते मा श्री नवनाथ भिमा साठे, युवा नेते शिवाजी साठे, दीपक शिंदे, नारायणदेव विकास सहकारी सोसायटी चेअरमन मा श्री राम साठे, नवनाथ साठे, सुभाष साठे, कैलास साठे, मनोहर साठे, जि. प. केंद्र प्रमुख मा श्री येनपुरे, शाळेचे मुख्याध्यापिका उषा दाभाडे, शिक्षक मा श्री झोजे, नीलम साठे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite