Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब हडपसर सेंट्रलच्या अध्यक्षपदी डॉ.दीपक कुमार गायके.

17 Jul 2022

रोटरी क्लब हडपसर सेंट्रलच्या अध्यक्षपदी दीपक कुमार गायके यांची निवड करण्यात आली.मावळते अध्यक्ष संपत खोमणे यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्विकारली. सेक्रेटरीपदी रंजन पराडकर यांची निवड करण्यात आली. हॉटेल आयरीस हडपसर येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी नियोजित प्रांतपाल मंजु फडके,वामन भुरे,माजी अध्यक्ष महेंद्र लुणिया,शारदा लुणिया,सोनाली पराडकर,आदि मान्यवरांच्या बरोबरच अन्य पदाधिकारी,रोटरी  सदस्य,व कुटुंबिय उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष दीपक कुमार यांनी आगामी काळात आरटीओ येथे वृक्षारोपण,ग्रामीण भागात हॅप्पी स्कूल प्रोजेक्ट,रक्तदान शिबीर आदी समाजोपयोगी प्रकल्प राबविणार असल्याचे नमूद केले.  

छायाचित्र : दीपक कुमार गायके. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite