Peoples Media Pune header

Go Back

रोटरी ई क्लब ऑफ पुणे डायमंडच्या अध्यक्षपदी प्रकाश सुथार.

27 Jul 2022

रोटरी ई क्लब ऑफ पुणे डायमाडच्या अध्यक्षपदी प्रकाश सुथार यांची नियुक्ती करण्यात आली. मावळते अध्यक्ष पवन जोशी यांच्या कडून त्यांनी सूत्रे स्वीकारली. तर सेक्रेटरीपदी भूषण शहा यांची निवड करण्यात आली. मराठा चेंबर्स सेनापती बापट रस्ता येथील सुमंत मुळगावकर सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रांतपाल डॉ.अनिल परमार,माजी प्रांतपाल डॉ.दीपक शिकारपूर,माजी प्रांतपाल मोहन पालेशा,सहाय्यक प्रांतपाल संतोष परदेशी,आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी पदाधिकारी,रोटरी सदस्य व कुटुंबिय उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष प्रकाश सुथार यांनी आगामी काळात ग्रामीण भागात पाणी,विद्यार्थिनींना सँनिटरी नॅप्किन वाटप,गणेशोत्सवात निर्माल्य विल्हेवाट,व अन्य समाजोपयोगी उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite