Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब ऑफ विज्डमच्या अध्यक्षपदी वैशाली वर्णेकर.

05 Aug 2022

रोटरी क्लब ऑफ विज्डमच्या अध्यक्षपदी वैशाली वर्णेकर यांची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष हेमंत पुराणिक यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली.  सचिवपदी सारंग बालंखे तर खजिनदारपदी आशा मेडसीकर यांची निवड करण्यात आली. पुण्याई सभागृह कोथरूड येथे नुकत्याच संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रांतपाल डॉ.अनिल परमार,माजी प्रांतपाल पंकज शहा आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी सदस्य व कुटुंबिय उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष वैशाली वर्णेकर यांनी आगामी काळात पर्यावरण,शिक्षण,आरोग्य व अन्य समाजोपयोगी प्रकल्प राबविणार असल्याचे संगितले.

छायाचित्र : वैशाली वर्णेकर

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite