Peoples Media Pune header

Go Back

*राज्यावरील सर्व संकट दूर होऊ दे, सामाजिक,राजकीय पर्यावरण आपल्याला पाहण्यास मिळू दे : डॉ. नीलम गोऱ्हे* उपसभापती नीलम गोऱ्हे आणि मिलिंद नार्वेकर यांनी कुटुंबियांसह पुण्यातील मानाच्या गणपतीच दर्शन घेतले

04 Sep 2022

पुणे दि.०४ : हे गणराया आपल राज्य सुफलाम सुफलाम होऊ दे, राज्यावरील सर्व संकट दूर कर आणि सामाजिक, राजकीय पर्यावरण आपल्याला पाहण्यास मिळू दे, हीच गणराया चरणी प्रार्थना असल्याची भावना शिवसेना नेत्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मानाच्या पाच गणपतीच्या दर्शनानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधी सोबत बोलताना व्यक्त केली. पुणे शहरातील मानाचा पहिला कसबा गणपती, अखिल मंडई गणपती मंदिरात जाऊन शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी त्यांच्या कुटुंबियांसह दर्शन घेतले. यावेळी शिवसेना शहरसंघटक राजेंद्र शिंदे, माजी नगरसेवक विशाल धनवडे, उपशहरप्रमुख आनंद गोयल, राजू विटकर यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, करोनानंतर जवळपास दोन वर्षांनी गणेशोत्सव आपण सर्वजण मोठ्या उत्साहात साजरा करीत आहोत हे पाहून खूप आनंद वाटत आहे. मात्र त्याच दरम्यान आपण आपल्या आरोग्याची देखील काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. सध्याच्या राजकीय घडामोडी बाबत त्या म्हणल्या की,मागील काही काळात अनेक घटना घडल्या आहेत.पण शिवसेना आजवर प्रत्येक संकटामधून फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घेतली आहे.त्यामुळे भगवद्गीतेत सांगितल आहे की, जे कोणी गेलेले आहेत. त्यांचा शोक करीत बसू नका त्या भूमिकेतून काम चालल आहे. कधी ना कधी घर का भुला हुआ, परत येईल अस मला स्वतःला वाटत आहे. पण या संदर्भात जो काही अंतिम निर्णय घ्यायचा आहे. तो सर्वस्वी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे, पक्षश्रेष्ठी निर्णय घेतली अशी भूमिका त्यांनी मांडली. यावेळी कसबा मंडळाचे मुरलीधर देशपांडे, दगडूशेठ गणेश मंडळाचे महेश सूर्यवंशी, हेमंत पवार, मंडई गणेश मंडळाचे संजय मते, जोगेश्वरी गणेश मंडळाचे राजाभाऊ टिकर, गुरुजी गणेश तालीम मंडळाचे राजुशेठ परदेशी, तुळशीबाग गणेश मंडळाचे नितीन पंडित, विनायक कदम, केशरीवाडा गणेश मंडळाचे रोहित टिळक, स्वप्नील पोरे, शिवसेना पदाधिकारी हेरंब ढेरे, अमोल घुमे, हेमंत पवार, अश्विनी शिंदे, अनिता परदेशी आदी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite